वंदू श्री गणेशा

वंदू श्री गणेशा

Monday, 6 September 2021


श्री महागणपती  ( भोसलेकालीन ) सोनेगांव तलाव, नागपूर
नागपूच्या पश्चिमेला म्हणजे प्रतापनगर चौकातून सोनेगांव कडे जातांना भोसलेकालीन तलाव असून तलावाचे बांधकाम  उकृष्ट व मजबूत असल्याचे दिसून येते सृष्टी सौंदर्य सुध्दा आल्हादायक आहे या तलाकाठी दक्षिण दिशेला तोंड केलेली हनुमानाची मूर्ती असून उत्तरेकडे गणपती आहे स्थळ अतिशय रमणिय, निवांत व सुंदर आहे अशा या ठिकाणी भव्य शेंदूर चर्चित डाव्यासोंडेचा महागणपती डावी मांडी घालून बसलेलाअसून हा महागणपती नागपूरला गेल्यावर आवश्यक पहावा भोसलेकालीन महागणपती  
जय गजानन